भावना, अस्मिता जरुर जपा पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष द्या!

Date:

Share post:

भावना, अस्मिता जरुर जपा पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष द्या!

Be sure to take care of your emotions and self-esteem, but pay attention to food, clothing, shelter, health, and education!

 

योगेश वसंत त्रिवेदी
योगेश वसंत त्रिवेदी

 

 

 

 

 

योगेश वसंत त्रिवेदी,
समाज विकास संवाद!
मुंबई,

भावना, अस्मिता जरुर जपा पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष द्या, अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमी चा प्रश्न मार्गी लागला, 

‘हुं खातो नथी -अने खावा देतो नथी’

(मी खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही) असे ठणकावून सांगत नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी

भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. संसदभवनाच्या पायऱ्यांवर माथा टेकला, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रणाम करुन

या देशाचा पंतप्रधान नव्हे तर प्रधानसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. झपाटल्यासारखे कार्य करतांना देशाला जागतिक स्तरावर

एक जबरदस्त प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. शेजारी राष्ट्रांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सुद्धा मागेपुढे

पाहिले नाही. महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा सपाटाच लावला. भारतीय जनता पक्षाच्या संघटन मजबुतीसाठी आपले विश्वासू सहकारी

अमित शाह यांच्या मदतीने राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, जगत्प्रकाश नड्डा आणि

अन्य सहकाऱ्यांच्या सहयोगाने देशात योग्य ती पावले टाकण्यास प्रारंभ केला. हां हां म्हणता 2019 साल उजाडले

आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या तुलनेने दोन पावले पुढे जात आणखी घवघवीत यश पटकावले।

 

 

आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष ! लोकसभेच्या 543 पैकी भारतीय जनता पक्षाच्या 282 वरुन 303 जागा झाल्या!

लोकसभेच्या 543 पैकी भारतीय जनता पक्षाच्या 282 वरुन 303 जागा झाल्या. हातात प्रचंड आणि सुस्पष्ट बहुमत असतांनाही

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन केली. सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन राज्य शकट हाकण्यासाठी वाटचाल न थकता,

न दमता दिवसाचे 18/18 तास काम करुन सत्तरीच्या जवळ पोहोचतांनाही तरुणांना लाजवील असा अफाट उत्साह नरेंद्र मोदी यांनी

देशाला नव्हे तर अवघ्या विश्वाला दाखवून दिला. ‘हाथी चले अपनी चाल……’

या पद्धतीने ते काम करताहेत. पण भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर आणि अतीउत्साही लोकांनी नको तेवढी

निष्ठा दाखविण्यासाठी जी काही कामें करुन ठेवलीत मग अगदी 2014 पासूनच जर पाहिले तर बरोबर लक्षात येते.

आपण नेत्यांच्या पुढे पुढे करुन, नको तितकी ‘चमचे’गिरी करुन केवळ आपलेच नव्हे तर पक्षाचेही नुकसान करीत आहोत याचे

भान, त्याची जाण नाही. केंद्र सरकारने ज्या ज्या काही लोकहिताच्या योजना पुढे आणल्या आहेत,

जे जे काही लोकहितवादी निर्णय घेतले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कुणाची ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

किंबहुना त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची जनतेच्या शेवटच्या माणसापर्यंत माहिती करुन देण्याची जबाबदारी कुणाची ?

अंत्योदय म्हणजे काय ? संपूर्ण क्रांती म्हणजे काय ? रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचविणे हेच नां ?

काय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन,

दळणवळण, परिवहन मंत्री नितीन गडकरी, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आदी मंडळी प्रत्येक व्यक्ती कडे जाऊन

सांगणार काय, की अरे बाबांनो, हे आम्ही तुमच्यासाठी केलंय बरं ! या प्रत्येक निर्णय आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी

पक्षाच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कुटाळक्या, कुचेष्टा न करता कंबर कसून काम केले पाहिजे।

 

 

आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष ! अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमी चा प्रश्न मार्गी लागला!

अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमी चा प्रश्न मार्गी लागला. घटनेच्या 370 कलमाच्या संदर्भात सुद्धा 70 वर्षांत जो होऊ शकला नव्हता

तो धाडसी आणि साहसी निर्णय अमित शाह यांनी लीलया मार्गी लावतांना जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या

अस्मितेचा प्रश्न सोडविला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले आता आणखी धाडसी निर्णय घेण्यात

येत आहेत. परंतु भावनिक आणि अस्मितेचे मुद्दे त्या त्या योग्य ठिकाणी जतन करण्यासाठी एका बाजूला प्रयत्न करावेत

त्याच बरोबर गेल्या 70 वर्षात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत प्रश्न अजूनही सुटू शकलेले नाहीत.

याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात रोजच्या रोज

विविध प्रकारचे प्रश्न समोर उभे राहतात.  उपलब्धता आणि मागणी यांची सांगड घालण्यासाठी शासन आणि प्रशासन यांना

तारेवरची कसरत करावी लागते. बेरोजगारी, उद्योग व्यवसाय, शेतकरी, आदिवासी, महिला दीनदुबळ्यांचे,

असंघटितांचे प्रश्न वाढताहेत. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी समाजातील प्रत्येक पुढाऱ्यांनी झटण्याची आवश्यकता आहे.

हे सारे प्रश्न आ वासून उभे असतांना भावनात्मक मुद्दे पुढे करुन सामाजिक शांतता बिघडविण्याचे प्रयत्न जाणूनबुजून होणार आहेत

परंतु भावना, अस्मिता आणि स्वाभिमान यांची जपणूक करतांना आपल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही,

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून, सजग राहून वागण्याचा,

काम करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती ने करण्याची गरज आहे।

 

 

आपले श्रद्धास्थान जपतांना दुसऱ्या व्यक्तीच्या श्रद्धास्थानाला धक्का लागणार नाही याची दक्षता लक्षात घेऊन वाटचाल करीत रहायला हवे!

आपले श्रद्धास्थान जपतांना दुसऱ्या व्यक्तीच्या श्रद्धास्थानाला धक्का लागणार नाही याची दक्षता, काळजी घेतली जाते की नाही,

हे लक्षात घेऊन वाटचाल करीत रहायला हवे. काही व्यक्ती या जाणूनबुजून अशा गोष्टी करतात आणि आपले उपद्रवमूल्य

वाढविण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती ला किती महत्त्व द्यायचे हे आपणच पाहिले पाहिजे, ठरविले पाहिजे.

अशा काही वाचाळवीरांना महत्त्व न देता,  अशा वाचाळवीरांकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम. छत्रपती शिवाजी महाराज,

छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी,

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या

पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत सर्वांना समाजात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही श्रद्धास्थाने मानणारा समाज आहे,

वर्ग आहे. या प्रत्येक श्रद्धास्थानाची जपणूक करतांना, त्यांच्याबद्दलच्या भावना जपतांना, दुसऱ्यांच्या भावना दुखावणार नाहीत,

दुसऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, तडा जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शाहू महाराज,

महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे.  प्रत्येक महापुरुष त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत म्हणून एकाची तुलना

दुसऱ्यांबरोबर करण्याचा मोह टाळला पाहिजे. प्रत्येक महापुरुषांच्या संदर्भात उल्लेख करतांना आपण कुठे आहोत,

याचा मनात विचार करणे गरजेचे आहे. आपण दुसऱ्या व्यक्ती ला सम्मान दिला तर दुसरी व्यक्ती आपला आदर राखू शकेल.

अरे म्हटले की कारे होणारच।

 

 

आपण काही प्रभू श्रीरामचंद्र नाही की आपण सोडलेला बाण लक्ष्यभेद करुन पुन्हा आपल्या भात्यात येईल!

आपण काही प्रभू श्रीरामचंद्र नाही की आपण सोडलेला बाण लक्ष्यभेद करुन पुन्हा आपल्या भात्यात येईल.

मुखातून बाहेर पडलेला शब्द पुन्हा मुखात येणार नाही. काहींना उद्गार म्हणतात तर काहींना मुक्ताफळे,

त्यामुळे आपण काय बोलतो याचा आपणच विचार करायला हवा. जीभेला झालेली जखम बरी होते. निसर्गाने दिलेली ती देणगी आहे.

पण जीभेमुळे झालेली जखम खोलवर जाते. अर्थात, हे ज्याने त्याने ठरवावे, आपण कसे वागायचे ते. फक्त आपल्यामुळे समाजाचे

स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे ! नरेंद्र मोदी यांनी सबका साथ,

सबका विकास या बरोबरच आता सबका विश्वास हे आपल्या आधीच्या सूत्रात जोडले आहे. त्याकडे लक्ष देऊ या आणि भावना,

अस्मिता, स्वाभिमान यांची जपणूक करतांनाच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे अद्यापही न सुटलेले प्रश्न मार्गी

लावण्यासाठी सहकार्य, समन्वय, सौहार्द आणि सामंजस्याने हातात हात घालून पुढे जाऊ या।

योगेश वसंत त्रिवेदी,

(yogeshtrivedi55@ gmail.com, 9892935321)

आज तक ताजा खबर, आज का समाचार, अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमी चा प्रश्न मार्गी लागला,

#महाराष्ट्र, #गोवा, #मुंबई, श्रीरामचंद्र, श्रीराम जन्मभूमी,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

 Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

4 COMMENTS

Leave a Reply

Related articles

पीएम मोदी ने लॉन्च की अमृत भारत स्टेशन योजना।

पीएम मोदी ने लॉन्च की अमृत भारत स्टेशन योजना

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली?

Hindenburg Report May Discipline Adani Group & Prosper It Further.

Hindenburg report may discipline Adani Group and prosper It further.In 2006, A renowned economic affairs expert and a very potent journalist Mr. Swaminathan S. A. Ayer researched and wrote a paper for the Cato Institute on Gujarat's new strategy of port-based development .This strategy was launched by Congress chief minister Chimanbhai Patel in the early 1990s and expanded by BJP's successors.

Jadui Pitara- A Play-Based Learning-Teaching Material Tailored For Children Aged 3-8 Years Launched.

Jadui Pitara - A play-based learning-teaching material tailored for children Aged 3-8 Years Launched By union education minister Shri Dharmendra Pradhan.Learning - Teaching Material for Foundational Stage Jadui-Pitara has been envisaged under National Education Policy 2020 (NEP2020).Jadui Pitara developed under the National Curriculum Framework is available in 13 Indian languages and