शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो-योगेश वसंत त्रिवेदी!

Date:

Share post:

शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु!

हिंदूंना परके करु नका हो- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच महत्त्वाचे!

Sharad Rao- All those living in India are Hindu! 

Don’t alienate Hindus- ‘Everyone together- everyone’s development- everyone’s faith’ is the most important thing!

योगेश वसंत त्रिवेदी
योगेश वसंत त्रिवेदी

 

 

 

 

 

योगेश वसंत त्रिवेदी,
समाज विकास संवाद!
मुंबई,

 

शरदराव, हिंदुस्थानात राहतो तो हिंदु! हिंदूंना परके करु नका हो- ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच महत्त्वाचे!-योगेश वसंत त्रिवेदी, कौरव पांडवांच्या युद्धात कोण जिंकले, हिंदुस्थानात हिंदूंना जेवढे अधिकार,

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या ह. भ. प. निवृत्तीमहाराज वक्ते यांनी आधुनिक भारताच्या राजकारणातील चाणक्य,

भारताचे माजी संरक्षण आणि  कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्यावर

हिंदूविरोधी असा ठपका ठेवीत समस्त वारकरी संप्रदायाने श्री. शरद पवार यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावू नये,

कार्यक्रमाचे आमंत्रण देऊ नये, असा फतवा काढल्याची बातमी वाचली आणि भारताच्या फाळणीपासूनचा सारा घटनाक्रम

मनःचक्षूंसमोरुन झर्रकन सरकला. भारतावर ब्रिटिशांनी तब्बल दिडशे वर्षे राजवट गाजवितांना फोडा आणि झोडा ही नीति

अवलंबून भारतातील हिंदु आणि मुस्लिम यांच्या मध्ये फूट पाडली. १९३७ साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची

जी आसेतुहिमाचल ही अखंड भारताची भूमिका होती तीच भूमिका बँरिस्टर मोहम्मद अली जीना यांची होती.

परंतु दहा वर्षांत जीना यांच्या कानीकपाळी, ठोकून ठाकून हिंदूंसाठी हिंदुस्थान आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान ही भूमिका

गळी उतरविण्यासाठी ब्रिटिशांनी भाग पाडले. मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधी यांना ती भूमिका

नाईलाजाने मान्य करावी लागली आणि १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान तसेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्थान

म्हणजे भारत किंबहुना पुढचा इंडिया असा आपला देश ब्रिटिशांनी आपल्या हाती तुकडे/फाळणी करुन सुपूर्द केला.

महात्मा गांधी यांनी एकतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वरील विशेष प्रेमापोटी भारताच्या पंतप्रधान पदी बसविले अथवा

तर सरदार वल्लभभाई पटेल यांना जर भारताचे पंतप्रधान बनविले तर आपल्यावर गुजराती म्हणून गुजराती नेत्यांची निवड केली

असा आरोप होण्याची भीती वाटत असावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हाती भारताचे राज्यशकट सोपविण्यात आले असावे.

 

 

हिंदुस्थानात राहतो तो हिंदु – हिंदुस्थान च्या राजधानीत हिंदु गणराज्य हिंदुस्थान हा फलक लावू शकलेलो नाही!

 

काहीही असले तरी जे घडले ते घडले परंतु त्याचे दूरगामी परिणाम भारतात आणि विशेष म्हणजे भारतातील समस्त हिंदू बांधवांना

भोगावे लागले व लागताहेत. कारण आपल्या हजारो वर्षाच्या परंपरेनंतर केवळ दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी

आपल्या देशाची परिस्थिती बिकट करुन टाकली आहे, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. या देशाची १९४७ साली झालेली

फाळणीच मुळी धर्माच्या आधारावर झाली आहे आणि मुसलमानांना पाकिस्तान तसेच हिंदूंना हिंदुस्थान !

आजही आपण पाकिस्तानात सचिवालयावर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हा तिथे अभिमानाने आणि आपल्या नाकावर

टिच्चून लावलेला फलक पाहू शकतो. पण भारताच्या किंबहुना हिंदुस्थान च्या राजधानीत हिंदु गणराज्य हिंदुस्थान हा फलक

लावू शकलेलो नाही. कारण १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी २६ जानेवारी १९५० रोजी

डॉ. भीमराव रामजी उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून स्वीकारले

आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. भारताची फाळणी झाल्यावर मुस्लिम बांधवांसाठी पाकिस्तान आणि

हिंदु बांधवांसाठी हिंदुस्थान असे ढोबळमानाने समजण्यात येत होते आणि या देशात राहणारे सारे हिंदु मग भले ते कोणत्याही

जाती धर्माचे असोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरळसोट व्याख्या हिंदुत्वाची सांगितली आहे की,

महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु,

आमचे हिंदुत्व हे शेंडीजानव्याचे हिंदुत्व नाही तर आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व.

 

 

हिंदुस्थानात हिंदूंना जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार मुस्लिम बांधवांना आहेत!

 

भारतात, हिंदुस्थानात हिंदूंना जेवढे अधिकार आहेत तेवढेच किंबहुना काकणभर जास्तच अधिकार मुस्लिम बांधवांना आहेत.

पाकिस्तान मध्ये मशीदीवरच्या भोंग्यांना परवेझ मुशर्रफ यांनी बंदी घातली पण हिंदुस्थानात सकाळ उजाडते ती अल्लाह हो अकबर

या बांगेने. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. वांद्रे येथील रेल्वे स्थानक परिसरात ईदच्या दिवशी हजारोंच्या संख्येने

मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. अंधेरी असो की मेट्रो चित्रपटगृह परिसरात किंबहुना मुस्लिम बहुल परिसरात नमाज अदा

करण्यात येते. शरदराव, आपण १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलात आणि समांतर काँग्रेस काढली,

जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केलात.

त्यावेळी भारतीय जनसंघाच्या हशु अडवाणी, उत्तमराव पाटील, दिलवरसिंह डोंगरसिंह पाडवी,

प्रमिलाताई टोपले या नेत्यांना आपण साथी सदानंद वर्दे, जगन्नाथ जाधव, भाई वैद्य यांच्या सोबतीने आपल्या मंत्रिमंडळात घेतलेत.

तेंव्हापासून आपल्याला कोणत्याही विचारधारेच्या पक्षांचा परहेज नव्हता आणि नाही.

देशाचे तर ठीक पण महाराष्ट्राचे राजकारण आपण स्वतःभोवती फिरवित राहिलात.

 

कोणत्या उमेदवारासमोर कोण निवडून येणार हे आपणच ठरवित आलात।

 

कुणी कुणासोबत युती करायची, कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची हे

आपणच ठरवीत आलात. कोणत्या उमेदवारासमोर कोण निवडून येणार हे आपणच ठरवित आलात.

विरोधी पक्षनेते कोण असावे याचाही निर्णय आपणच घेत आलात. कुणाला कोणत्या पक्षात पाठवायचे हेही आपण निश्चित करीत आलात.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावले तर या सर्वांची उदाहरणे दिसून येतील. शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे शिल्पकार

भले बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हे लौकिकार्थाने म्हटले जात असले तरी ही युती आपणच घडवून आणली हे

दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी आपले अनुयायी मदनशेठ बाफना यांना डॉ. बालाजी तांबे यांच्या कार्ल्याच्या आश्रमात सांगितले होते.

रा. सु. गवई हे प्रमोद नवलकर यांच्या ऐवजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कसे झाले, याचे परिषदेच्या कामकाज नोंदी मध्ये

नवलकर यांच्या भाषणातून पहायला मिळू शकेल. बाळासाहेब वाघमारे हे हाा इतिहास उपलब्ध करुन देऊ शकतील.

 

 

मुलायमसिंह यादव यांनी पाकिस्तानला तब्बल दोनहजार कोटी रुपयांची मदत करण्याची सूचना केली होती!

 

२०१४ साली सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला न मागता आपण पाठिंबा जाहीर केलात. शिवसेना तेंव्हाही विरोधी पक्षात होती.

आपण कधीच ईश्वरसाक्ष अशी शपथ घेतली नाहीत ना आपल्या सुकन्या सुप्रियाताई अथवा पुतणे अजीतदादा यांनी कधी घेतली.

आपण सदैव गांभीर्य पूर्वक द्रुढकथन करतो की, असेच म्हणत आलात. माणसाने कुठे, कुणाच्या घरात,

कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात निश्चित नाही. मग एकमेकांवर वृथा टीका करण्यात काय अर्थ आहे ?

कुणी ठरवून हिंदु होत नाही अथवा ठरवून इस्लाम धर्मात जन्म घेत नाही. जो ज्या धर्मात, समाजात जन्माला आला आहे

त्याचा आपण निश्चितच सन्मान ठेवायला हवा. परंतु कुणाला तरी आनंद व्हावा, आपलेपणा वाटावा म्हणून त्या पद्धतीने वागणे

म्हणजे अनुनय करणे हा अर्थ होत नाही का ? भारतीय जनता पक्षाचे मुख्तार अब्बास नकवी, शहानवाज हुसैन,

आरीफ मोहम्मद खान ही मंडळी हिंदु आणि मुस्लिम असा भेदाभेद करीत नाहीत.

आरीफ मोहम्मद खान हे कुराणात असलेले आयत जितक्या सफाईदार पणे बोलताना दिसून येतात तसेच ते

श्रीमद्भगवतगीता मधील श्लोक सुद्धा अस्खलितरित्या म्हणून दाखवितात. हिंदु मुस्लिम यांच्या संदर्भात कोणताही किंतू

या मंडळींच्या वागण्याबोलण्यात दिसत नाही. पण शरदराव, आपण काय मुलायमसिंह यादव काय हे जणू मुस्लिम बांधवांचे मसीहाच

असल्यासारखे वागता. त्यामुळे आपल्याबद्दल नको ते आणि नको तेवढे गैरसमज पसरतात.

मुलायमसिंह यादव यांनी पाकिस्तानला तब्बल दोनहजार कोटी रुपयांची मदत करण्याची सूचना केली होती,

तेंव्हा काहूर माजले होते. आपण निरीश्वरवादी असल्याचे बोलले जाते. पण कन्या सुप्रियाताई यांच्या आग्रहाखातर आपण पंढरपूरला

विठ्ठलाच्या दर्शनाला गेलात, नारायण राणे यांच्या आमंत्रणावरुन त्यांच्या घराच्या गणपती बाप्पा चे दर्शन घेतलेत.

 

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भातील आपली जुनी भाषणे लोकं विसरलेली नाहीत!

 

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली तेंव्हा पामलू वेंकट नरसिंहराव हे पंतप्रधान होते. शरदराव,

आपण तेंव्हा देशाचे संरक्षण मंत्री आणि शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते. बाबरी पतनास प्रारंभ झाला तेव्हा पासून

ध्वस्त होईपर्यंत नरसिंहराव हे पूजेत बसून होते. त्यांना जेव्हा कळले की बाबरी ध्वस्त झाली, तेंव्हाच त्यांनी

आपली पूजा आटोपली असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आपली भूमिका ही तेंव्हा पासूनच शंकेच्या फेऱ्यात फिरत राहिली.

मग आपले शागीर्द, मानसपुत्र यांचे वागणे बोलणे तर पहायलाच नको. चहा पेक्षा किटली गरम, किंबहुना बाटग्याची बांग मोठी

अशीच चर्चा ऐकायला मिळते. बाबरी प्रकरण असो की मालेगांव बॉम्बस्फोट किंवा मुंबई येथील १२ मार्च १९९३ चे बारा बॉम्बस्फोट या

सर्वच प्रकरणात आपली भूमिका ही हिंदुविरोधी किंबहुना हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात प्रकट झाली आहे.

अनेक प्रकरणे ही न्याय प्रविष्ट आहेत. पण शितावरुन भाताची परीक्षा होते. शरदराव, आपण स्वतः

आपल्या भाषणात हिंदुस्थान असाच उल्लेख करीत आला आहात. आपणही खरे काय हे जाणता. छत्रपती शिवाजी महाराज,

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भातील आपली जुनी भाषणे लोकं विसरलेली नाहीत.

सावरकर स्मारक उद्घाटन कार्यक्रमात आपण केलेले भाषण नुकतेच समाज माध्यमातून पुन्हा प्रसारित झाले आहे.

आपण काय किंवा श्रीमती इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या संदर्भात काढलेले गौरवोद्गार संबंधितांकडे सुरक्षित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असतांना पुण्यात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अर्ध्या रात्री काढून टाकण्यात आला.

समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते, अशी विधाने करुन आपण कुणाला खुष करु पाहता,

हे सर्वच जण जाणतात.

 

 

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच महत्त्वाचे!

 

शिवसेना सोडून आपल्या दरबारात हजर झालेले आणि घराघरात शिवाजीराजे, संभाजीराजे म्हणून

दूरचित्रवाणी च्या माध्यमातून पोहोचलेले अमोल कोल्हे यांना आपण लोकसभेत पाठविलेत आणि एरव्ही शाहू, फुले,

आंबेडकर यांच्या नावाशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दिवसाची सुरुवात होत नव्हती त्याच आपल्या

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘चला शिवस्वराज्यासाठी’ असा नारा देण्यात आला.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेऊन आपण

राज्य करीत आहात, त्याच राज्यात आपण एकशेतीस कोटी लोकसंख्येच्या हिंदुस्थानात बहुसंख्येने असलेल्या हिंदु बांधवांना आपण

परके का करता ? अल्पसंख्याक समाजात मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध, शीख आदी असंख्य असतांना केवळ

एखाद्या समाजाला बरे वाटावे म्हणून त्यांना कवटाळतांना इतर परके होणार नाहीत याची दक्षता आपण घ्यायला नको कां ?

आज आपण सर्व गोष्टींच्या पलीकडे गेलेले आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपणास मार्गदर्शक म्हटले आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले बोट धरुन राजकारणात आल्याचे जाहीर पणे सांगितले आहे. महाभारतातला एक बर्बरिकचा प्रसंग आहे.

 

हिंदूंना परके करु नका – अठरा दिवस चाललेल्या कौरव पांडवांच्या युद्धात कोण जिंकले ? कोण हरले ? कुणी कुणाचा वध केला ?

 

अठरा दिवस चाललेल्या कौरव पांडवांच्या युद्धात कोण जिंकले ? कोण हरले ? कुणी कुणाचा वध केला ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे देतांना बर्बरिकने ही सर्व भगवान श्रीकृष्ण यांची लीला असल्याचे सांगितले. तद्वतच आधुनिक भारतात

नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे अनुक्रमे गुजरात आणि महाराष्ट्रात राजकारण घडवीत आहेत, असे अलीकडच्या काळात दिसून येते.

अर्थात शरदराव, आपण रामायण महाभारत मानत असाल तरच ती उपमा देता येईल. असो, तूर्तास तरी आपण हिंदु बांधवांना

परके करु नका, एवढेच सांगणे आहे. बाकी सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमस्व !

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हेच महत्त्वाचे.

योगेश वसंत त्रिवेदी, #9892935321.

कौरव पांडवांच्या युद्धात कोण जिंकले, हिंदुस्थानात हिंदूंना जेवढे अधिकार, हिंदूंना परके करु नका,

Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,

Gadgets, science-technology, Global Samvad, Amazing Amazon News,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद!

1 COMMENT

Leave a Reply

Related articles

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.

क्या है आर्थिक रूप से पिछरा वर्ग की आरक्षण ? ई डब्ल्यू एस आरक्षण का लाभ किसे और कैसे मिलेगा ?

क्या है आर्थिक रूप से पिछरा वर्ग की आरक्षण ?   ई डब्ल्यू एस आरक्षण का लाभ किसे और कैसे मिलेगा ?केंद्र में नरेन्द्र मोदी सरकार की एक ऐतिहासिक फैसले को न्यायिक वैधता देते हुएभारत की सर्वोच्च न्यायालय ने आर्थिक रूप से कमजोर वर्गों अर्थात ई डब्ल्यू एस आरक्षण को न्यायिक मान्यता दिया!सुप्रीम कोर्ट की पांच-न्यायाधीशों की पीठ ने सोमवार को 3-2 के फैसले में सरकारी नौकरियों औरशैक्षणिक संस्थानों में आर्थिक रूप से कमजोर वर्गों (ई डब्ल्यू एस) के लिए 10% आरक्षण की वैधता को बरकरार रखा।

चंद्रकांत दादा पाटील मिल कामगार आई बडील्यांचा घरी जन्माला एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता !

चंद्रकांत दादा पाटील मिल कामगार आई बडील्यांचा घरी जन्माला एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता !- डॉ. दिनेश थिटे (बरिष्ठ पत्रकार...