शरदराव- `कृष्ण’ बनू शकला नाहीत निदान `मोहन’ (धारिया) तरी बना -योगेश वसंत त्रिवेदी

Date:

Share post:

शरदराव! कृष्ण बनू शकला नाहीत – निदान मोहन (धारिया) तरी बना !

Sharad Rao! You Couldn’t become Krishna – at least become Mohan (Dharia)!
-योगेश वसंत त्रिवेदी
समाज विकास संवाद!
मुंबई ,

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत निदान मोहन धारिया तरी बना-योगेश वसंत त्रिवेदी, शरदराव मुख्यमंत्री – इतिहास कोणी विसरलेले नाही, भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत – अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् –

परित्राणाय साधूनां – विनाशाय च दुष्कृताम् – धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। -भगवान श्रीकृष्ण

धर्माला ग्लानी आली, धर्म संकटात आला तर दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि

धर्माचे रक्षण करुन तो पुनर्स्थापित करण्यासाठी भगवान विष्णू पुन्हा अवतार घेईल,

असा सार भगवान श्रीकृष्ण या विष्णूच्या अवताराने म्हटले आहे।

महाभारत झाले आणि महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश सांगितला ती

होती 18 अध्यायांची श्रीमद्भगवद्गीता।

यात भगवान श्रीकृष्णाने राजकारण काय असते ते समस्त ब्रह्मांडाला दाखवून दिले।

भगवान श्रीकृष्ण ने राजकारण करतांना धर्म, सत्य, शांती, सज्जनता, शालिनता, सौंहार्द,

समन्वय, सहकार्य, सौजन्य अशा तमाम सद्गुणांचे दर्शन घडविले।

 

भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात -समाज विकास
भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात -समाज विकास

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत ! भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात!

म्हणून भगवान श्रीकृष्ण हे आद्य राजकारणी म्हटले जातात।

भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70 व्या

दशकात खरा राजकारणी पहायला मिळाला तो शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या रुपाने।

तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, डॉ. मनोहर जोशी हे ही  चाणक्यच म्हणवले जात होते।

पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि डॉ. मनोहर जोशी हे `

आता उरलो मी केवळ मार्गदर्शनापुरता’ या भूमिकेत आहेत।

पण आता सक्रीय राजनीति मध्ये चार चाणक्यांपैकी उरलेत ते केवळ आणि केवळ शरदचंद्र गोविंदराव पवार।

अर्थात असे दहा शरद पवार मागे टाकून पुढे जाणारा नवा चाणक्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या रुपाने पुढे आला आहे।

 

 

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत ! देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे दोन चाणक्य सध्या जोरात आहेत!

देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे दोन चाणक्य सध्या जोरात आहेत।

पण आपण विचार करतोय तो 70 व्या दशकात निर्माण झालेल्या चाणक्य शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा।

भगवान श्रीकृष्णाने धर्म, सत्य आणि सत्कर्मासाठी राजनीति केली;

पण राजकीय पंडितांनी किंबहुना पवार विरोधकांनी शरदरावांच्या नावापुढे कुटील, कपटी,

कावेबाज, धुर्त, मुरब्बी अशी विशेषणे लावलीत।

पवार धुर्त आणि मुरब्बी आहेत यात वादच नाही पण कुटील, कपटी, कावेबाज कसे ?

महाराष्ट्राचे थोर सुसंस्कृत शालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी एक तरुण हुशार मुलगा राजकारणात आणला।

यशवंतरावांनी आपल्या परिवारातल्या कुणासही राजकारणात आणलं नाही।

पण जो मुलगा राजकारणात आणला त्याचे नांव शरद. हेच आपले शरदचंद्र गोविंदराव पवार।

वयाच्या अवघ्या तिशीत शरदराव हे महाराष्ट्राच्या राजकारणात आले।

इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती आणि त्यावेळेला तरुण तुर्क चंद्रशेखर,

मोहन धारिया आणि कृष्णकांत या काँग्रेसी नेत्यांनी इंदिराजींना

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला;

पण इंदिराजींनी तो न मानता चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत यांना तुरंगात डांबले।

 

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत ! आणिबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या!

अनभिक्त सम्राज्ञी इंदिराजींनी 1977 च्या जानेवारीत आणिबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या;

आणि देशाच्या राजकीय क्षीतिजावर भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, समाजवादी आणि

संघटना काँग्रेस अशा चार पक्षांची जनता पार्टी जन्माला आली।

मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत  हे या जनता पार्टीचे अविभाज्य भाग बनले।

नव्हे केवळ भागच नाही तर जनता पार्टीचे नेतृत्वही चंद्रशेखर यांनी केले।

याचवेळी महाराष्ट्रात वसंतराव बंडुजी पाटील म्हणजेच वसंतदादा आणि नाशिकराव तिरपुडे

यांचे मंत्रिमंडळ  होते;  आणि शरद पवार हे या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते।

पण राजकारणाची दिशा कशी वाहते ती कशी ओळखावी याचे बाळकडू मिळालेले

शरद पवार यांनी वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनता पार्टी,

शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने पुरोगामी लोकशाही दल स्थापन करुन वयाच्या

अवघ्या 37 व्या वर्षी 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पटकावले।

 

 

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत- शरद पवारांनी दादांच्या (वसंतदादा) पाठीत खंजीर खुपसला'-समाज विकास
शरद पवारांनी दादांच्या (वसंतदादा) पाठीत खंजीर खुपसला’-समाज विकास

इतिहास कोणी विसरलेले नाही! शरद पवारांनी दादांच्या (वसंतदादा) पाठीत खंजीर खुपसला’!

त्यावेळी वृत्तपत्रात आणि राजकीय वर्तुळात, शरद पवारांनी दादांच्या (वसंतदादा) पाठीत

खंजीर खुपसला’ असा वाक्प्रचार वापरण्यात आला होता।

अर्थात दोन वर्षापूर्वीच्या एका दिवाळी अंकात एक लेख प्रसिध्द झाला त्यात यशवंतराव व

शरदराव यांच्या निकटवर्तीयाने शरदरावांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता तर;

शरद पवारांना दादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून पुलोद स्थापन करण्यात यशवंतरावांची

फूस होती, असे नमुद केले होते।

आता यशवंतरावही नाहीत आणि ते लेखकही नाहीत आहेत ते केवळ चाणक्य शरद पवार।

 

इतिहास कोणी विसरलेले नाही ! शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची ती काही पहिली वेळ नव्हती!

शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची ती काही पहिली वेळ नव्हती।

यशवंतराव आणि वसंतदादाही काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि नाशिकराव तिरपुडे,

रामराव आदिक, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे निष्ठावंत केवळ इंदिरा गांधींच्या पाठीशी होते।

शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदेही काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्यांमध्ये होते।

यशवंतराव चव्हाणांनी मनाचा मोठेपणा दाखवून लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर

असलेले पंतप्रधानपद इंदिराजींच्या `हाती’ सुपूर्द केले अन्यथा इतिहास बदलला असता पण

पंतप्रधान न बनलेले यशवंतरराव उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले।

ज्या इंदिराजींच्या हाती यशवंतरावांनी पंतप्रधानपद सुपूर्द केले त्याच इंदिराजींनी यशवंतरावांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी ताटकळत ठेवले होते।

 

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत! इतिहास कोणी विसरलेले नाही!

हा इतिहास कोणी विसरलेले नाही आणि यशवंतरावांच्या चुका दुरुस्त करुन पुढे निघालेले

त्यांचे मानसपुत्र शरदराव यांनी राजीव गांधींना औरंगाबादेत बोलवून जाहीर सभेत

आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला।

त्यावेळी राजीव गांधींचे हितचिंतक त्यांना सांगत होते की शरदरावांना पक्षात घेऊ नका पण

राजीव गांधी यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत शरद रावांना पक्षात सामावून घेतले।

म्हणूनच कदाचित आता राजीव गांधींचे समर्थन राहुल, सोनिया, प्रियंका पेक्षा जास्त

शरदराव करीत असावेत. तसे राजीव गांधी हे खरे अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणावे लागतील।

कारण राजीव गांधी यांचा पिंड हा राजकारणी नव्हता पण संजय गांधींच्या अपघातामुळे

राजीव गांधींना इंदिराजींनी पुढे आणले (अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नेते पक्षात असले तरी)।

शरद पवार यांनी औरंगाबादेत काँग्रेस प्रवेश केल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर

त्यांचा 25 जून 1988 रोजी राज्याभिषेक झाला।

 

 

शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत - पुन्हा दूसऱ्यांदा शरदराव मुख्यमंत्री-समाज विकास
पुन्हा दूसऱ्यांदा शरदराव मुख्यमंत्री-समाज विकास

इतिहास कोणी विसरलेले नाही! अकरा वर्षांनी पुन्हा दूसऱ्यांदा शरदराव मुख्यमंत्री बनले!

काय योगायोग पहा आणिबाणी 25 जून 1977 ला आणली आणि त्याच्या बरोबर

अकरा वर्षांनी पुन्हा दूसऱ्यांदा शरदराव मुख्यमंत्री बनले।

सलग पाच वर्षे शरदराव मुख्यमंत्री कधीच राहु शकले नाहीत. जरी त्यांनी चार वेळा

महाराष्ट्राचे नेतृत्व केले असले तरी।

त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द किती काळाची होती हे पहायला गेलो तर;

पहिल्यांदा 18 जुलै 1978 रोजी पुलोद सरकारचे मुख्यमंत्री झालेले शरदराव

17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिराजींच्या फटक्याने सरकार बरखास्त झाल्यामुळे पायउतार झाले।

25 जून 1988 रोजी काँग्रेसी मुख्यमंत्री झालेले शरदराव विधानसभेच्या निवडणुकांमुळे

3 मार्च 1990 आणि 4 मार्च 1990 ते 25 जून 1995 असे या पदावर राहिले।

 

 

पंडितजींच्या मदतीसाठी हिमालयाच्या मदतीला यशवंतरावांचा सह्याद्री धावून गेला!

1962 साली पंडितजींच्या मदतीसाठी हिमालयाच्या मदतीला यशवंतरावांचा सह्याद्री धावून

गेला तद्नंतरच 1991 साली पामलू वेंकट नरसिंहराव यांच्या सारख्या प्रकांडपंडित

पंतप्रधानांच्या संरक्षणा(मंत्री) साठी यशवंतररावांचा हा मानसपुत्र शरदचंद्र गोविंदराव पवार

केंद्रात गेला।

पण सुधाकरराव नाईक महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी होते आणि शरदराव केंद्रात रक्षामंत्री होते

तेव्हा 6 डिसेंबर 1992 साली बाबरी पतनानंतर देशभरात दंगली उसळल्या।

सुधाकरराव नाईकांनी महाराष्ट्रात अनेकांच्या आवळलेल्या नाड्या शरदरावांना खटकत

असल्यामुळे दंगल नियंत्रणात आणू शकत नसल्याचा आरोप ठेवून शरदराव महाराष्ट्रात आले।

6 मार्च 1993 रोजी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले. ते काँग्रेसचेच पण अवघ्या 6 दिवसात

12 मार्च 1993 रोजी यशवंतरावांच्या  जयंतीदिनी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले।

चाणक्य शरद पवारांनी 13 बॉम्बस्फोट झाल्याचे सांगून तेरावे नाव मशीदीचे टाकले।

1990 पासून शिवसेना भाजप युती फॉर्मात होती।

 

 

1995 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती सत्तेवर-समाज संवाद
शरदराव कृष्ण बनू शकला नाहीत – 1995 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती सत्तेवर-समाज संवाद

 

 

 

 

 

 

 

1995 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती सत्तेवर आली!

विधानसभा निवडणुकीत 1995 साली शिवसेना भाजपा युती सत्तेवर आली!

45 अपक्ष आमदार त्यात पवार विरोधाची मजबूत फळी 14 मार्च 1993 रोजी

डॉ. मनोहर गजानन जोशी आणि गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या नेतृत्वाखाली

महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले।

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या पक्षाने कोणता उमेदवार उभा करायचा ही कला

सुध्दा शरद पवारांच्या अंगी असल्याची चर्चा राजकीय पंडितांमध्ये सुरु असे।

विधानपरिषदेत प्रमोद नवलकर विरोधी पक्षनेते होणार असताना मखराम पवार आणि;

त्र्यंबक मारुती उर्फ टी.एम कांबळे या दोन आमदारांना असंलग्न घोषित करण्यात येऊन

रा. सू. गवई यांना विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांनी मिळवून दिले।

तेंव्हा शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी हे कसले विरोधी पक्षनेते ? हे तर सरकारमान्य

विरोधी पक्षनेते ! असे उद्गार काढले होते।

 

इतिहास कोणी विसरलेले नाही! शरदराव मुख्यमंत्री, पहा शरद राव काय काय मॅनेज करु शकतात!

लातूर किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा भूकंपावर चर्चा होत असतांना विधानपरिषदेत

विरोधी पखनेते सुधीरभाऊ जोशी यांनी, `पहा शरद राव काय काय मॅनेज करु शकतात।

महाराष्ट्राचा नकाशा जर पाहिला तर बारामती हा भूकंपप्रवण भाग नाही. म्हणजे जो माणूस

भुकंप सुध्दा मॅनेज करु शकतो तो माणूस काय काय नाही मॅनेज करु शकणार?”

असा खडा सवाल करुन पवारांची खासियत सांगितली होती.

एखादा उमेदवार उभा करायचा आणि त्याच्या समोर दुसरा उमेदवार पण;

आपणच टाकून अधिकृत उमेदवाराचे बारा वाजवायचे हे शरद पवारच करु शकतात,

अशी चर्चा महाराष्ट्रातले राजकारणी करीत असत।

मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे ? श्रेष्ठींकडे कागाळ्या करणाऱ्यांचा पत्ता कसा कापायचा ?

याचे तर किस्से भरपूर मिळतील पण एकदा  एका नेत्याचे नांव मंत्रीपदासाठी घेतले जात होते

आणि अचानक मंत्रीमंडळाच्या यादीतून ते नांव गायब झाले।

विधानभवनात प्रा. मधु दंडवते यांना ते नेते भेटले आणि आपली कैफियत मांडू लागले।

 

मोहन धारिया तरी बना ! पवारांच्या सफारीला चार खिसे असतात- 1978 साली संघ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणारे शरद पवार!

तेव्हा प्रा. मधु दंडवते यांनी त्या नेत्याला विचारले की तुम्हाला शरद पवारांनी सांगितले तेव्हा

त्यांनी सफारी परिधान केला होता का ?

तो नेता हो म्हणाला. पण विचारले का ? तेंव्हा प्रा. मधु दंडवते यांनी सांगितले की

पवारांच्या सफारीला चार खिसे असतात आणि;

प्रत्येक खिशात वेगवेगळी यादी असते तुम्हाला यादी दाखवली ती वेगळ्या खिशातली।

प्रा. मधु दंडवते यांच्या किश्श्यावर तो नेता पहातच राहिला, असे अनेक नेत्यांना

`पहातच’ ठेवण्याचे काम झालेले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यावर जातीयवादी,

धर्मांध असा आरोप करणाऱ्या शरदरावांनी यांची साथ अणि सोबत कुठे कुठे घेतली हे

काही  लपून राहिलेले नाही।

1978 साली संघ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणारे शरद पवार हे

वाजपेयी पंतप्रधान असतांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून लाल

दिव्याचीगाडी लेवून वावरत होते।

2014 साली न मागता देवेंद्र फडणवीस सरकारला पाठींबा देणे हा इतिहास सर्वश्रुतच आहे।

1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळचा मुद्दा काढून शरद पवार,

पी.ए. संगमा आणि तारीक अन्वर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली

पण 1999 ते आजतागायत त्यांची साथ सोडलेली नाही।

 

 

भूखंडाचे श्रीखंड चा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला-समाज
भूखंडाचे श्रीखंड चा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला-समाज

भूखंडाचे श्रीखंड चा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला!

वांद्रे वरळी सागरी सेतूच्या उद्घाटनाला सोनिया गांधी आल्या होत्या मग सत्ता असो की विरोध पक्ष।

वांद्रे वरळी सागरी सेतूच्या उद्घाटनाला सोनिया गांधी आल्या होत्या

आणि; त्यांना खुश करण्यासाठी शरद पवारांनी राजीव गांधींचे नांव सागरी सेतूला सुचविले आणि;

याबाबतच्या ठरावाची फाईल सत्वर मंजुर करण्याचे आदेशही दिले।  का ?

राजीव गांधींच्या शिवाय मुंबईत कोणत्या मान्यवरांचा जन्म झाला नव्हता ?

की केवळ गांधी परिवाराचे प्रेम ? असे ऐकायला येत होते।

भूखंडाचे श्रीखंड चा आरोप मृणाल गोरे यांनी सभागृहात केला आणि तेंव्हा छगन भुजबळ यांनी;

या भूखंडाच्या श्रीखंडाचे राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र सभागृहात झळकवले होते।

हेच शरद पवार, मृणाल गोरे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे एकत्र यावेत हीच तर पवारांची किमया.

आयुष्यभर काँग्रेसला शिव्या घालणारे नेते हातात हात घेऊन चालतात तेव्हा निष्ठा,

तत्व हे शब्द मागे पडतात।

घराणेशाहीचा आरोप कुणीही कुणावर करु शकत  नाही पण स्वतःच्या मुलांना `सांभाळण्या’

साठी दुसऱ्यांना तरी कमी लेखू नका।

नाही नाही म्हणता पार्थला मैदानात उतरविले आता रोहितही उतरणार।

मग रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी काय घोडे मारले ?

 

शरदराव- `कृष्ण' बनू शकला नाहीत निदान `मोहन' (धारिया) तरी बना -योगेश वसंत त्रिवेदी
शरदराव- `कृष्ण’ बनू शकला नाहीत निदान `मोहन’ (धारिया) तरी बना -योगेश वसंत त्रिवेदी

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंझार नेते वसंतराव चव्हाण!

राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंझार नेते वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांची राज्यहभेची जागा

मिळेल म्हणून; त्यांच्या पत्नीने नोकरी चा राजीनामा दिला।

परंतु वसंत चव्हाण यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याऐवजी लाडकी लेक राज्यसभेवर पाठवली। `

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे’ अशी निदान तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही।

शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षाा या राष्ट्रीय आपत्तीत सरकारला योग्य सल्ले देण्यासाठी पुढे यावे,

ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेने केली तर चुकीचे निश्चितच ठरणार नाही।

 

 

शरदराव – निदान श्रीकृष्णाचे नाम साधर्म्य असलेले मोहन धारिया तरी बना-योगेश वसंत त्रिवेदी!

शरदराव – निदान श्रीकृष्णाचे नाम साधर्म्य असलेले मोहन धारिया तरी बना-योगेश वसंत त्रिवेदी!

चंद्रशेखर आणि मोहन धारिया हे आपले मित्र होते. मोहन धारिया हे वादातीत व्यक्तिमत्व होते।

मोहन धारिया यांनी केलेले वनराईचे काम, अमरीश पटेल यांचे शिरपूर पॅटर्न,

अर्जुन खोतकर यांचे जालन्यातले काम पहा !

अशी असंख्य कामं महाराष्ट्रात झाली आहेत आणि होत आहेत।

विधायक चळवळीचा इतिहास पोपटराव पवारांनी पण दाखवला आहे. सयाजी शिंदे,

मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची कामे पुढे आली।

मोहन धारिया यांचे वनराईचे काम आणि भंवरलाल गांधी यांच्या सारख्या खानदेशातल्या

भगीरथाचे काम पाहिल्यानंतर फालतू टक्क्यटोणप्यांचे राजकारण करण्याऐवजी `शरदराव!

तुम्ही भगवान श्रीकृष्ण बनू शकला नाहीत पण शकुनी तरी बनू नका।

निदान श्रीकृष्णाचे नाम साधर्म्य असलेले मोहन(धारिया) तरी बना. महाराष्ट्र निश्चित देशाला

दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही।

अर्थात आता हे काम देवेंद्र फडणवीस हे उध्दव ठाकरे यांच्या सहकार्याने पुढे नेतील।

निदान घटिया ‘राज’नीतितून तरी बाहेर या।   –

योगेश वसंत त्रिवेदी

#राजनीति, शरदराव मुख्यमंत्री, चाणक्य, कृष्ण, मोहन_धारिया, भगवान श्रीकृष्ण,

मोहन धारिया तरी बना-योगेश वसंत त्रिवेदी, समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,

Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

1 COMMENT

Leave a Reply

Related articles

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली?

Hindenburg Report May Discipline Adani Group & Prosper It Further.

Hindenburg report may discipline Adani Group and prosper It further.In 2006, A renowned economic affairs expert and a very potent journalist Mr. Swaminathan S. A. Ayer researched and wrote a paper for the Cato Institute on Gujarat's new strategy of port-based development .This strategy was launched by Congress chief minister Chimanbhai Patel in the early 1990s and expanded by BJP's successors.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.