वृक्ष लागवडीचे मिशन यशस्वी करा- मुनगंटीवार यांचे आवाहन व my plant ॲपचे उदघाटन!

Date:

Share post:

वृक्ष लागवडीचे मिशन यशस्वी करामुनगंटीवार यांचे आवाहन व my plant ॲपचे उदघाटन!

वनमंत्र्यांच्या हस्ते “my plant”  मोबाईल ॲपचे उदघाटन

समाज विकास संवाद!
मुंबई ,

वृक्ष लागवडीचे मिशन यशस्वी करा– मुनगंटीवार यांचे आवाहन व my plant ॲप चे उदघाटन!

राज्यात  लोकसहभागातून १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड

करण्याचा वन विभागाचा संकल्प आहे. हे  मिशन सर्वांनी मिळून यशस्वी करा,

माझ्या आपल्याला शुभेच्छा आहेत असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आज वनमंत्र्यांनी राज्यात वन विभागाने नियुक्त केलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ

कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनसचिव विकास खारगे

यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वनमंत्र्यांच्या

हस्ते “my plant ” या मोबाईल ॲपेचे उदघाटनही करण्यात आले.

 

माय प्लॅन्ट (my plant) मोबाईल ॲप!

वृक्ष लागवड कार्यक्रमात शासकीय विभागांना दिलेले उद्दिष्ट, त्याची पुर्तता,

लावण्यात येणाऱ्या वृक्ष प्रजाती अशा सर्व कामाची माहिती  वन विभागाच्या

संकेतस्थळावर अपलोड करण्याची सुविधा आहे.

परंतू खाजगी स्वरूपात, सामाजिक, अध्यात्मिक, स्वंयसेवी संस्था, उद्योग- व्यापार क्षेत्रातील

प्रतिनिधी यांच्याकडून ही मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. त्यांनी किती झाडे लावली,

कोणत्या प्रजातीची आणि कुठे लावली याची माहिती वन विभागाच्या संगणक प्रणालीवर

नोंदवण्याची सुविधा निर्माण करणे गरजेचे होते.

 

वृक्ष लागवडीचे मिशन! वन विभागाने “माय प्लांट” नावाचे मोबाईल ॲप तयार  केले आहे!

ही गरज ओळखूनच वन विभागाने “माय प्लांट” नावाचे मोबाईल ॲप तयार  केले आहे.

हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून या सर्व व्यक्ती आणि संस्थांना या ॲपद्वारे त्यांनी

वृक्ष लागवडीचे केलेले काम वन विभागाकडे नोंदवता येईल. या ॲपवरील माहिती

वन विभागाच्या संकेतस्थळावर आपोआप नोंदवली जाईल.

my plant हे मोबाईल ॲप  दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत सुरु होईल.

त्याचा लाभ वैयक्तिक, संस्थात्मक आणि संघटनात्मक पातळीवर वृक्ष लागवड करणाऱ्या

प्रत्येकाने घ्यावा व आपली वृक्ष लागवडीची माहिती शासनाकडे नोंदवावी,

असे आवाहन ही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

वृक्ष लागवडीच्या सात दिवसांच्या कालावधीत रोपांची मागणी करणारे अनेक दूरध्वनी

आपल्याला येतील.

प्रत्येकांनी त्याला संयमाने उत्तर द्यावे, वृक्ष कुठे व कशा पद्धतीने मिळू शकतील याची माहिती

द्यावी अशा सूचना करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,

वृक्ष एका मोठ्या जागेत (ब्लॉकमध्ये) लावले तर ते जगवणे, त्याचे संगोपन करणे सोपे असते.

परंतू  छोट्या आणि विखुरलेल्या जागेत लावल्या जाणाऱ्या, रस्त्याच्या दुतर्फा लावल्या

जाणाऱ्या वृक्षांची काळजी घेणे, त्याला ट्रीगार्डची व्यवस्था करणे गरजेचे ठरते.

याकडे ही सर्वांनी लक्ष द्यावे. काही उद्योजक, व्यापारी, बँका त्यांच्या सीएसआर निधीतून

वृक्ष उपलब्ध करून देतात, ट्रीगार्ड पुरवतात त्यांच्याशीही सर्वांनी संपर्कात  राहावे,

रोप मागणाऱ्या प्रत्येकाला रोप मिळेल अशी व्यवस्था करावी.

 

वृक्ष लागवडीचे मिशन! राज्य ४ कोटी वृक्ष लागवडीसाठी सज्ज- विकास  खारगे!

१ ते ७ जुलै या काळात वन विभागाच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला युद्धपातळीवर

काम करायचे आहे. हे करतांना पुढच्या वर्षीसाठी माहिती बँक ही तयार करायची आहे.

जाहिराती, संदेश, नावीन्यपूर्ण उपक्रम, स्वंयसेवी, सामाजिक, अध्यात्मिक संस्थांची डेटा बँक

तयार करावयाची आहे.

कारण २०१८ साली राज्यात आपल्याला १३ कोटी वृक्ष लागवडीचे आव्हान पूर्ण करायचे आहे,

त्याची तयारी आतापासूनच सुरु करावयाची आहे. या डेटा बँकमुळे यावर्षी कोणत्या जिल्ह्याने

कसे आणि काय काम केले, कोणत्या नावीन्यपूर्ण कल्पना राबविल्या हे आपल्याला कळेल आणि

त्यातून आपल्याला अपूर्णांकातून पुर्णांकाकडे जाता येईल, असे ही वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य ४ कोटी वृक्ष लागवडीसाठी सज्ज- विकास  खारगे

राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीची  तयारी पुर्ण झाली असून आतापर्यंत ४ कोटी ४१ लाख

खड्डे खोदून झाले आहेत तसेच १६ कोटी पेक्षा अधिक रोप उपलब्ध आहेत अशी  माहिती

वन सचिव विकास खारगे यांनी यावेळी दिली.  प्रत्येक विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट आणि

त्याची पुर्तता करतांना सेक्टरनिहाय वृक्ष लागवडीची माहिती स्वतंत्रपणे ठेवली जावी

अशा सूचना त्यांनी यावेळी सर्वांना दिल्या यामध्ये रेल्वे, संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर होणारी

तसेच कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या वृक्ष लागवडीचा समावेश करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वृक्ष लागवडीचे मिशन, मुनगंटीवार यांचे आवाहन, my plant ॲपचे उदघाटन, #समाज_विकास_संवाद,

Society News, News of Development, Development News,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

2 COMMENTS

Leave a Reply

Related articles

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.

चंद्रकांत दादा पाटील मिल कामगार आई बडील्यांचा घरी जन्माला एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता !

चंद्रकांत दादा पाटील मिल कामगार आई बडील्यांचा घरी जन्माला एक संवेदनशील आणि कर्तबगार नेता !- डॉ. दिनेश थिटे (बरिष्ठ पत्रकार...

प्रधानमंत्री मोदी जी ने नवनियुक्त महाराष्ट्र मंत्रिमंडल को दी है बधाई!  शपथ लेने वाले महाराष्ट्र मंत्रियो की विस्तृत जानकारी!

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने महाराष्ट्र की सभी नवनियुक्त मंत्रियो को शपथ ग्रहण पर दी है बधाई!प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने नव गठित महाराष्ट्र सरकार में मंत्री पद की शपथ ग्रहण करने वाले सभी माननीयों मंत्री गनों  को ट्विटर सन्देश के माध्यम से बधाई दी है।इस अवसर पर प्रधानमंत्री ने मराठी एवं अंग्रेजी भाषा में लिखी गयी ट्वीट में कहा;